हेमा मालिनी कोणाच्या प्रेमात पडली?

Foto
शोले सारखा संस्मरणीय आणि ऐतिहासिक चित्रपटाचे दिग्दर्शक रमेश सिप्पीचा आगामी चित्रपट शिमला मिर्चीचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हैराण करणारी गोष्ट हि आहे कि शोले, शान, सागर सारख्या सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे रमेश सिप्पी २५ वर्षानंतर पुन्हा चित्रपट घेऊन येत आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये हेमा मालिनी पुन्हा आपल्या बसंतीच्या अंदाजामध्ये पाहायला मिळत आहे. हेमा मालिनीचे वय सध्या ७१ वर्षे झाले आहे.हेमा मालिनी आपल्या आगामी शिमला मिर्च चित्रपटामध्ये राजकुमार रावसोबत रोमांस करताना पाहायला मिळत आहे. सर्वात मजेशीर गोष्ट हि आहे कि या चित्रपटामध्ये हेमा मालिनीच्या मुलीची भूमिका साकारणारी रकुल प्रीत सिंह सुद्धा त्याच मुलाच्या प्रेमात पडते.शिमला मिर्च चित्रपटाचा २.३० मिनिटाचा ट्रेलर लोकांचे मनोरंजन करण्यात सफल राहिला आहे.ज्याचे कारण राजकुमार राव आणि रकुल प्रीत सिंह पेक्षा हेमा मालिनी मानले जात आहे. या चित्रपटामध्ये अनेक वर्षानंतर हेमा मालिनी शोलेच्या बसंतीच्या अंदाजामध्ये परत आली आहे. जर या चित्रपटाच्या स्टोरीबद्दल बोलायचे झाले तर शिमला मिर्च चित्रपटाची स्टोरी एक सिंगल मदरची आहे. जिची भूमिका हेमा मालिनी साकारत आहे. हेमा मालिनी आपल्या एकटेपणामुळे खूपच दुखी राहते.आईचे एकटेपण पाहून तिची मुलगी तिला खुश राहण्यास सांगते. तेव्हा अचानक हेमा मालिनीला एक प्रेमपत्र मिळते जे तिच्या मुलीसाठी असते, पण त्या लव लेटरवर कोणतेही नाव नसल्यामुळे हेमा मालिनी हे समजते कि ते तिच्यासाठी आहे.यानंतर सुरु होते राजकुमार राव आणि हेमा मालिनी ची लव स्टोरी. जी पडद्यावर पाहणे रोमांचकारी ठरेल.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker